Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 22 ऑक्टोबर रोजी भारताने धरमशालेत झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात शुभमन गिलने 26 धावांची खेळी केली, पण या खेळीदरम्यान त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
गिलने या खेळीदरम्यान वनडे क्रिकेट कारकिर्दीत 2000 धावा पूर्ण केल्या आहेत.
गिलने त्याच्या वनडे कारकिर्दीत 38 व्या डावात फलंदाजी करताना 2000 धावा पूर्ण केल्या आहेत.
त्यामुळे गिल वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
गिलने 38 डावात 2000 वनडे धावा करत हाशिम आमलाचा 15 वर्षे जूना विक्रम मोडला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या आमलाने 9 मार्च 2008 रोजी भारताविरुद्ध खेळताना कारकिर्दीत 2000 वनडे धावांचा टप्पा पार केला होता. तो त्याचा 40 वा वनडे डाव होता.
तसेच वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या झहीर अब्बास, केविन पीटरसन, बाबर आझम आणि रस्सी वॅन डर द्युसेन आहेत. या चौघांनीही प्रत्येकी 45 डावात 2000 वनडे धावा केल्या आहेत.