Sameer Panditrao
गोमंतकियांचे श्रद्धास्थान म्हणजे म्हापशातील प्रसिद्ध श्री देव बोडगेश्वर.
डिसेंबर महिना संपत आला, की बोडगेश्वराच्या जत्रेचे प्रत्येकाला वेध लागतात.
बोडगेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर चारही बाजूने उघडे आहे.
मंदिराच्या मध्यभागी बोडगेश्वराची हातात काठी, डोक्यावर फेटा असलेली आकर्षक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते.
श्रीदेव बोडगेश्वराच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा ३२ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
श्री देव बोडगेश्वराच्या ९० व्या महान जत्रोत्सवाला रविवार (ता.१२) सुरुवात झाली.
जत्रोत्सवानिमित्त सकाळपासून हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यासाठी मंदिरस्थळी लांब रांगा लागल्या होत्या.