Manish Jadhav
सध्या देशात आयपीएल 2025ची धूम पाहायला मिळत आहे. या लीगमध्ये जगातील तमाम स्टार खेळाडू खेळत आहेत. भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर पंजाब संघाचं नेतृत्व करत आहे.
आयपीएलदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टीम इंडियाच्या या (श्रेयस) स्टार खेळाडूला एक मोठं गिफ्ट दिलं.
गेल्या महिन्यात टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात श्रेयसने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. आता त्याला या शानदार कामगिरीबद्दल आयसीसीने हे गिफ्ट दिलं.
श्रेयसने मार्च 2025 चा आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला, त्याने न्यूझीलंडच्या जेकब डफी आणि रचिन रवींद्र यांना मागे सोडत हा पुरस्कार जिंकला. श्रेयसने दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला.
पुरस्कार जिंकल्याबद्दल श्रेयस म्हणाला की, ''मार्च महिन्यातील आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार जिंकल्याबद्दल खूप आनंद आहे. हा पुरस्कार जिंकण माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.''
श्रेयसने मार्च महिन्यात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळले असून 57.33 च्या सरासरीने 172 धावा केल्या. या काळात, त्याने ग्रुप अ सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 78 धावा तर सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 45 धावा आणि फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 48 धावा केल्या होत्या.