Kavya Powar
आपल्या भारतीय संस्कृतीनुसार श्रावण महिन्यात मांसाहार खाणे वर्ज्य आहे.
यामागे खूप कारणे असतात
आयुर्वेदानुसार, श्रावण हा असा महिना आहे ज्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती सर्वांत कमी होते.
या महिन्यात मांसाहारी पदार्थ खाल्ले तर पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो
कारण मांसाहारी पदार्थ पचायला जड असतात आणि म्हणूनच या काळात सहज पचणारे हलके पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
गोव्यात फक्त मासे खाणारे पक्के खव्वये सुद्धा या महिन्यात शाकाहारी अन्न स्वीकारतात
दुसरी बाजू म्हणजे या महिन्यात गोव्यात सणवार -व्रतवैकल्ये, उपास यामुळे घरी मांसाहारी पदार्थ शिजवले जात नाहीत