Akshata Chhatre
"रोज शॅम्पू केला तर केस पांढरे होतात!" लहानपणापासून कानावर पडलेल्या या सल्ल्यामुळे अनेकांना अजूनही वाटतं, की रोज केस धुतल्याने खरंच मोठं नुकसान होत असावं.
बरेच लोक रोज फक्त पाण्यानेच केस धुतात, शॅम्पू टाळतात. पाण्याचा केसांवर सतत संपर्क राहिल्याने केसांच्या मुळांमध्ये लवचिकता कमी होते, आणि मुळं नरम पडतात.
जसं हात पाण्यात राहिल्यावर त्वचा फुगते, तसंच केसही कमकुवत होतात. तसंच, फक्त पाण्याने केस स्वच्छ होत नाहीत; त्यामुळे डोक्यावर बॅक्टेरियाचा वाढता धोका असतो.
जिथे हवा दमट आहे, घाम, धूळ जास्त आहे तिथे आठवड्यातून ४–५ वेळा शॅम्पू करणं आवश्यक ठरतं. स्वच्छ, कोरड्या हवेत राहणाऱ्यांनी कमी वेळा शॅम्पू केला तरी चालतं.
ड्राय किंवा कुरळ्या केसांमध्ये नैसर्गिक तेलं आधीच कमी असतात रोज शॅम्पू केल्याने हे केस अजून कोरडे होतात.
सल्फेट-फ्री, माइल्ड किंवा औषधी शॅम्पू वापरावा. सल्फेट-फ्री, माइल्ड किंवा औषधी शॅम्पू वापरावा. केसांच्या प्रकारानुसार आणि हवामानानुसार शॅम्पूचं शेड्युल ठरवावं.