Akshata Chhatre
आजच्या डिजिटल युगात नातेसंबंधांचा स्वरूप झपाट्याने बदलत आहे.
पूर्वी जे संवाद फक्त जोडीदारांमध्ये होत, ते आज अनेकदा बाह्य माध्यमांकडे वळताना दिसतात.
विशेषतः अनेक तरुण आपल्या भावनांचा आणि नात्यांतील समस्या सामायिक करण्यासाठी आता ChatGPT सारख्या AI चॅटबॉट्सचा वापर करत आहेत.
ChatGPT वापरताना त्यांना केवळ समोरचं उत्तर ऐकून समाधान मिळत नाही, तर अनेक वेळा त्यांच्या अपेक्षेनुसारच प्रतिसाद मिळत असल्याने तो एक “थेरपिस्ट” असल्यासारखी भावना निर्माण होते.
AI सहानुभूतीची भाषा वापरू शकतो, पण तो माणसांच्या भावना समजू शकत नाही, ना त्याला तुमच्या मानसिक आरोग्याची जाणीव असते.
AI वापरणं चांगलं आहे, पण जोडीदाराची जागा घेण्यासाठी नाही तर त्यांच्याशी अधिक चांगलं नातं बांधण्यासाठीच.