Akshata Chhatre
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झोप अपुरी आणि तणाव जास्त असल्यामुळे केसांचे आरोग्य दुर्लक्षित होते.
केस गळणे, वाढ थांबणे, किंवा केस कमजोर होणे अशा समस्या अनेकांना भेडसावत आहेत.
बाजारात अनेक उपाय उपलब्ध असले तरी घरगुती आणि नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी ठरतात.
पण तेल दिवसा लावावं की रात्री? हा प्रश्न अनेकांना पडतो. पारंपरिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, रात्री झोपण्याआधी तेल लावणे उत्तम मानले जाते कारण त्या वेळी शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असते आणि तेलातील पोषण त्वचेत खोलवर शोषले जाते.
मात्र, रात्री वेळ न मिळाल्यास दिवसा, विशेषतः सुट्टीच्या दिवशी किंवा घरी असताना 1-2 तास तेल लावणे देखील फायदेशीर ठरते.
हेअर एक्स्पर्ट जावेद हबीब यांच्या मते, केस धुण्याच्या अगदी 15 मिनिटं आधी देखील जर थोडं तेल लावलं, तरी त्याचा सकारात्मक परिणाम होतो. तेल लावताना थोडं गरम केलेलं नारळ, बदाम किंवा आवळ्याचं तेल वापरावं.
केस विभागून सौम्य हातांनी मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते. तेल केवळ मुळांवर नाही, तर केसांच्या लांबीवर आणि टोकांवरही लावणं आवश्यक आहे.