Akshata Chhatre
आपल्यापैकी अनेकांना गोड खाणं खूप आवडतं एखादा गुलाबजाम किंवा रसगुल्ला मिळाला की चेहऱ्यावर आपोआप हास्य उमटतं.
आरोग्याच्या दृष्टीने गोड खाणं योग्य वेळी झालं पाहिजे, हे फार थोड्या लोकांना माहिती असतं. मधुमेह असो किंवा वजन कमी करण्याचा उद्देश, गोड खाण्याचे परिणाम खाल्ल्याच्या वेळेनुसार बदलतात.
रिकाम्या पोटी गोड खाल्ल्यास ते पटकन साखरेत रूपांतरित होतं आणि रक्तातील साखरेचा स्तर अचानक वाढतो, ज्यामुळे शरीरावर अनावश्यक ताण येतो.
जेवणानंतर गोड खाल्ल्यास शरीरातील इतर अन्नघटकांमुळे साखरेचं शोषण हळू होतं आणि साखर झपाट्याने वाढत नाही.
त्या वेळी पोटात आधीच फायबर, प्रथिने आणि थोडी चरबी असते, जी साखरेचं शोषण मंद करते. यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते आणि शरीराला धक्का बसत नाही.
उपाशी पोटी गोड खाल्ल्यास मात्र साखर झपाट्याने वाढते, काही वेळासाठी ऊर्जा मिळते, पण लगेचच थकवा, चक्कर, चिडचिड अशी लक्षणं जाणवू शकतात.
मेंदूला चुकीचा भूक संदेश मिळतो आणि अन्नाचे प्रमाण अनावश्यक वाढतं. या साखरेच्या ‘हाय-लो’ चक्रामुळे वजन वाढणं, लठ्ठपणा आणि इन्सुलिन रेसिस्टन्सचा धोका निर्माण होतो.