बॅट्समनला धडकी भरवणाऱ्या रावळपिंडी एक्स्प्रेसचा पाय सपाट होता

Rahul sadolikar

शोएब अख्तर

आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातल्या फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या शोएब अख्तरचं नाव क्रिकेटच्या इतिहासात महत्त्वाचं मानलं जातं.

Shoaib Akhtar | Dainik Gomantak

रावळपिंडी एक्स्प्रेस

13 ऑगस्ट 1975 रोजी जन्मलेला शोएब अख्तर त्याच्या कारकिर्दीत रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जायचा.

Shoaib Akhtar | Dainik Gomantak

सपाट पायांचा त्रास

शोएबचा जन्म झाला तेव्हा त्याचे पाय सपाट होते. चालताना तो कधीही त्याचा तोल राखू शकायचा नाही. वयाच्या 6 व्या वर्षापर्यंत या भेदक गोलंदाजाला चालण्यासाठी संघर्ष करावा लागला.

Shoaib Akhtar | Dainik Gomantak

शोएबचं आजारपण

आजोबांनी शोएबच्या आईला त्याच्या उपचारावर पैसे खर्च करणे थांबवावे आणि शोएबच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे वाचवं असं सांगावं इतका शोएब आजारी होता. लहानपणी त्याला डांग्या खोकल्यानेही ग्रासले होते.

Shoaib Akhtar | Dainik Gomantak

डॉक्टरांचा अंदाज

शोएब बरा झाला पण डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्याची फुफ्फुसे कायमची कमकुवत राहतील. हे सगळे अंदाज खोटे ठरवत शोएबची फुफ्फुसं तंदुरुस्त राहिली त्यामुळे त्याला वेगवान गोलंदाजीसाठी श्वास घेण्यास मदत झाली.

Shoaib Akhtar | Dainik Gomantak

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात

किशोरवयातच शोएबला मोटारसायकल आणि वेगाचे आकर्षण होते. तो लोकांना घाबरवायचा, त्याची मोटरसायकल तो प्रचंड वेगाने चालवायचा.

Shoaib Akhtar | Dainik Gomantak

फूटपाथवर रात्र काढली

निवडीसाठी आलेल्या शोएबने क्रिकेटच्या वेडापायी फूटपाथवर रात्र काढली.

Shoaib Akhtar | Dainik Gomantak

करिअर सुरू

1996 च्या इंग्लंड दौऱ्यावर शोएबची पाकिस्तान अ संघात निवड झाली. शोएबची 1996 मध्ये सहारा चषकाच्या उद्घाटनासाठी संघात निवड करण्यात आली होती. तथापि, त्याला संघातून वगळण्यात आले होते

Shoaib Akhtar | Dainik Gomantak

इडन गार्डनवर शोएब पहिल्यांदा

राहुल द्रविडचा स्टंप बाद केल्यामुळे ईडन गार्डनवर जमाव भडकला तेव्हा शोएब गोंधळला होता. इथेच शोएबने सचिन तेंडूलकरलाही आऊट केले. सचिनला आऊट करणे शोएबचे स्वप्न होते.

Shoaib Akhtar | Dainik Gomantak

शोएबवर बंदी

2008 मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर जाहीरपणे टीका केल्याबद्दल अख्तरवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती, पण आपल्या तुफानी गोलंदाजीसाठी शोएब नेहमी क्रिकेट रसिकांच्या लक्षात राहील.

Shoaib Akhtar | Dainik Gomantak

भारतातील ही पक्षी अभयारण्य पाहिलीयत का?

Bird Sanctuary In India | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी