Pramod Yadav
अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज गोवा, महाराष्ट्रासह सर्वत्र उत्साहास साजरी करण्यात आली.
गोव्यात फोंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी प्रसिद्ध योगगुरू रामदेव बाबांनी देखील छत्रपतींना अभिवादन केले.
यावेळी गोव्यातील नेते आणि मंत्री देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत आणि रामदेवबाबा यांंनी उपस्थितांना संबोधित केले.
मायकल आणि दिलायला लोबो यांनी देखील शिवजयंती साजरी केली.
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आशिर्वाद घेतले.
गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी देखील छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन केले.
गोव्यातील कलाकार अनुज रेडकर यांनी पानावर छत्रपतींची प्रतिकृती तयार केली आहे.