Shivaji Maharaj Coronation: शिवराज्याभिषेक, गुलामगिरीविरुद्ध स्वाभिमानाचा हुंकार!

दैनिक गोमन्तक डिजिटल

हिंदवी स्वराज्याचा उदय!

गुलामगिरीच्या अंधारात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला.एका सार्वभौम आणि लोककल्याणकारी राज्याची अधिकृत स्थापना.संपूर्ण भारतातील सत्तेचे समीकरण बदलून टाकणारा सुवर्णक्षण.

Shivaji Maharaj Coronation | Dainik Gomantak

दुर्गराज रायगड सजला देखणा

सुरक्षेच्या आणि भौगोलिक दृष्टीने शिवरायांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली. सोहळ्यासाठी रायगडावरील राजवाडा, बाजारपेठ आणि संपूर्ण परिसर नववधूसारखा सजला होता.

Shivaji Maharaj Coronation | Dainik Gomantak

काशीच्या विद्वानांचे शुभागमन!

काशीचे विख्यात शास्त्रज्ञ आणि महापंडित गागाभट्ट यांनी मुख्य पुरोहित म्हणून सर्व विधी संपन्न केले. शिवरायांचा राज्याभिषेक करून त्यांनी परकीय आक्रमकांच्या दास्याला सडेतोड उत्तर दिले.

Shivaji Maharaj Coronation | Dainik Gomantak

सप्तसिंधूंचे पवित्र जल

पवित्र नद्यांच्या जलाने मंगल स्नान! गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, सिंधू, नर्मदा आणि कावेरी या नद्यांचे पाणी खास आणले होते. चारही दिशांच्या समुद्रांचे पवित्र पाणीही सुवर्ण कलशात भरून आणले गेले.

Shivaji Maharaj Coronation | Dainik Gomantak

३२ मण सुवर्णसिंहासन

भव्य आणि दिव्य सुवर्णसिंहासन! सिंहासनासाठी तब्बल ३२ मण (सुमारे १२८० किलो) शुद्ध सोने वापरण्यात आले होते.सिंहासनावर मौल्यवान हिरे, माणके, पाचू आणि नवरत्ने जडवली होती.

Shivaji Maharaj Coronation | Dainik Gomantak

'छत्रपती' पदवी आणि जयघोष

प्रौढ प्रताप पुरेंडर: राजा शिवछत्रपती! महाराज सिंहासनावर आरूढ होताच त्यांना 'छत्रपती' ही पदवी बहाल करण्यात आली. "क्षत्रिय कुलावतंस, महाराज शिवछत्रपतींचा विजय असो!" या गर्जनेने वेशी आणि कडे दुमदुमले.

Shivaji Maharaj Coronation | Dainik Gomantak

शिवराई नाणे आणि नवीन कालगणना

स्वतःचे चलन आणि 'शिवराज्याभिषेक शक'! सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून 'शिवराई' आणि 'होन' ही सोन्या-तांब्याची नाणी सुरू झाली. शिवरायांनी स्वतःची नवीन कालगणना म्हणजेच 'राज्याभिषेक शक' सुरू केला.

Shivaji Maharaj Coronation | Dainik Gomantak

रयतेचे स्वराज्य

प्रजाहितदक्ष 'जनतेचा राजा'! स्वराज्याचा कारभार सुदृढ चालवण्यासाठी आठ मंत्र्यांचे 'अष्टप्रधान मंडळ' स्थापन केले. हा राज्याभिषेक स्वतःच्या श्रीमंतीसाठी नव्हता, तर गरिबांच्या, अठरापगड जातींच्या आणि शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी होता.

Shivaji Maharaj Coronation | Dainik Gomantak

'हे' 7 कानमंत्र, जे मुलांना बनवतील खऱ्या अर्थाने यशस्वी

Parenting Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा