Sameer Amunekar
सिंधुदुर्गातील शिरोडा बीच हा निसर्गप्रेमी आणि समुद्राचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी खास ठिकाण आहे.
शिरोडा बीचवर निळेशार समुद्राचे पाणी आणि स्वच्छ, विस्तीर्ण वाळूचा किनारा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेताना पाण्यात उतरून आंघोळ करण्यासाठी शिरोडा बीच पर्यटकांच्या पसंतीचा ठरतो. मात्र समुद्राची स्थिती आणि स्थानिक सूचनांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
शिरोडा बीचच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर विदेशी पर्यटकांचाही येथे वावर पाहायला मिळतो.
गर्दीच्या पर्यटनस्थळांपेक्षा तुलनेने निवांत वातावरण अनुभवायचे असेल, तर शिरोडा बीच एक चांगला पर्याय ठरू शकतो.
सायंकाळच्या वेळी समुद्रावर मावळणारा सूर्य आणि आकाशातील बदलते रंग शिरोडा बीचचे सौंदर्य आणखी खुलवतात.
निळाशार समुद्र, स्वच्छ किनारा आणि सुंदर निसर्ग यामुळे शिरोडा बीच कोकण सहलीतील खास आकर्षण ठरतो.