Rakup Preet- Jackky Wedding: रकुल जॅकीच्या लग्नात थिरकणार 'सेलेब्स'

Manish Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीतचं लगीन

बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंग सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. रकुलप्रीत तिचा प्रियकर आणि अभिनेता जॅकी भगनानीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

Rakul Preet Singh Jackky Bhagnani | Dainik Gomantak

रकुल-जॅकीच्या लग्नाची लगबग

दरम्यान, या जोडप्याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी अनेक सेलेब्स आधीच गोव्याला रवाना झाले आहेत. रकुलप्रीत आणि जॅकीच्या लग्नाबाबत आणखी अपडेट्स समोर येत आहेत.

Rakul Preet Singh Jackky Bhagnani | Dainik Gomantak

लग्नात धमाल

रकुलप्रीत आणि जॅकी भगनानीच्या लग्नात खूप धमाल होणार आहे. या जोडप्याच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनेक सेलेब्स थिरकतानाही दिसणार आहेत. या यादीत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचीही नावे आली आहेत.

Rakul Preet Singh Jackky Bhagnani | Dainik Gomantak

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा परफॉर्म करणार

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रासोबत रकुलप्रीत आणि जॅकीच्या लग्नात परफॉर्म करणार आहे.

raj kundra and shilpa shetty | Dainik Gomantak

जॅकीच्या वडिलांची राज कुंद्राची मैत्री

राज कुंद्राची जॅकीचे वडील वासू भगनानी यांच्याशी खूप चांगली मैत्री आहे.

raj kundra and shilpa shetty | Dainik Gomantak

रकुलप्रीत आणि जॅकी भगनानी लग्नबेडीत अडकणार

रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारीला गोव्यात लग्नबेडीत अडकणार आहेत. या जोडप्याच्या लग्नासाठी अनेक सेलेब्स गोव्याला रवाना झाले आहेत, ज्यांना विमानतळावर देखील स्पॉट करण्यात आले आहे.

Rakul Preet Singh Jackky Bhagnani | Dainik Gomantak

गोव्यातील लक्झरी हॉटेलमध्ये लग्न समारंभ

गोव्यातील आयटीसी ग्रॅट गोवा या लक्झरी हॉटेलमध्ये या जोडप्याचा विवाह संपन्न होणार आहे. महत्वाचे म्हणजे 3 दिवस लग्नाचा सोहळा असणार आहे. हे जोडपे पर्यावरणपूरक लग्न करणार असल्याने मोठ्या चर्चेत आहे.

Rakul Preet Singh Jackky Bhagnani | Dainik Gomantak
Rakul Preet-Jackky | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी