Akshay Nirmale
वुमन्स प्रीमियल लीग (WPL) साठी खेळाडुंचा लिलाव सोमवारी झाला. यात गोव्याच्या एकमेव क्रिकेटपटूची निवड झाली आहे.
गोव्याच्या या क्रिकेटपटूचे नाव आहे शिखा पांडे.
शिखा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर असून अष्टपैलू आहे.
शिखा भारती हवाई दलात स्क्वॉड्रन लीडरदेखील आहे.
शिखाला 40 लाख रूपये या मूळ किंमतीत दिल्ली कॅपिटल्स संघाने खरेदी केली. तिच्यासाठी गुजरात जायंट्स हा संघही इच्छुक होता.
2021 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुसऱ्या टी-20 लढतीतील शिखाचा एक चेंडू कमालीचा स्विंग झाला आणि त्यावर अलिसा लिली आऊट झाली. क्रिकेट पंडितांनी त्या चेंडुला बॉल ऑफ द सेंच्युरी अशी उपमा दिली आहे.
शिखा सध्या दक्षिण आफ्रिकेत असून तिथेच होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी सध्या शिखा कसून सराव करत आहे.