Pramod Yadav
गोव्यात 20 नोव्हेंबरपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे.
चित्रपट महोत्सवाच्या सहाव्या दिवशी,
गोव्याचे सांस्कृतिक रंग पाहायला मिळाले.
साहाव्या दिवशी गोव्यातील पांरपारिक शिगमोत्सवाचे दर्शन घडवण्यात आले.
सांगे तालुक्यातील पाईकदेव शिगमोत्सव समितीच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित नागरिकांनी गोव्यातील पांरपारिक सणाची अनुभूती घेतली.
शिगमोत्सव समितीच्या वतीने पांरपारिक पोषाख परिधान केला होता.
यावेळी इफ्फी परिसरातील वातावरण प्रफुल्लित झाले होते.
शिगमोत्सवाची प्रचिती घेण्यासाठी यावेळी अनेकजण उपस्थित होते.