दैनिक गोमन्तक
होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे. हा सण वाईटावर चांगल्याचे किंवा विजयाचे प्रतीक मानले जातो. चला जाणून घेऊयात गोव्यात हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो.
होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते. सगळ्या वाईट गोष्टींचे या अग्नीमध्ये दहन होऊन चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी प्रार्थना केली जाते. यादिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. होळीला नारळ वाहून होळी पेटवली जाते.
होलिका दहनाबरोबरच, हा सण रंगाचा म्हणून देखील ओळखला जातो. विविध रंगाची उधळण करत आनंद साजरा केला जातो. मोठ्या संख्येने एकत्र येत हा सण साजरा केला जातो.
गोव्यात शिगमोत्सवाचे वेगळेच महत्व आहे. या दिवशी पारंपारिक वस्त्र परिधान करुन वेगवेगळ्या कलाकृती साजऱ्या केल्या जातात.
महत्वाचे म्हणजे, गोव्यात शिगमोत्सवाचे दोन प्रकार पडतात. पहिला म्हणजे धाकला आणि थोरले असे दोन प्रकार पडतात.
धाकला शिगमोत्सव हा तिसवाडी, फोंडा, कळगुंट, केपे याठिकाणी साजरा केला जातो.
तर थोरला शिगमोत्सव हा डिचोली, बार्देश, सत्तरी, पेडणे या ठिकाणी साजरा केला जातो.