शरद पवारांचे सासरे होते प्रसिद्ध क्रिकेटर; जाणून घ्या त्यांच्याबद्दल...

Pranali Kodre

महाराष्ट्रच्या राजकारणात भूकंप

2 जुलै रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्याचे दिसून आले. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा चर्चेत आले.

Sharad Pawar | Twitter

शरद पवार आणि क्रिकेट

शरद पवार हे भारतातील अनुभवी राजकिय नेते असले, तरी त्यांचा क्रिकेटशीही जवळचा संबंध राहिला आहे.

Sharad Pawar | Twitter

आयसीसी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष

शरद पवार यांनी आतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

Sharad Pawar | Twitter

कुटुंबातही क्रिकेटशी संबंध

दरम्यान अनेकांना हे माहित नसेल की शरद पवार यांचे सासरे हे भारतीय क्रिकेटपटू होते.

Sadu Shinde and His Wife | Twitter

क्रिकेटर सासरे

शरद पवारांच्या सासऱ्यांचे नाव सदाशिव उर्फ सदू शिंदे. सदू शिंदे यांची मुलगी प्रतिभा यांचे लग्न शरद पवारांशी झाले आहे.

Sharad Pawar with Wife | Twitter

सदू शिंदे

सदू शिंदे हे फिरकी गोलंदाज होते. त्यांनी भारतासाठी ७ कसोटी सामने खेळताना १२ विकेट्स घेतल्या होत्या.

Sadu Shinde | Twitter

पहिला अन् अखेरचा सामना

सदू शिंदे यांनी १९४६ साली इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर पहिला कसोटी सामना खेळला, तर १९५२ साली लॉर्ड्सवरच इंग्लंडविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला.

Sadu Shinde | Twitter

कारकिर्द

मुंबई, महाराष्ट्र आणि बडोदा या संघांकडून ते देशांतर्गत क्रिकेट खेळले. त्यांनी 79 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 230 विकेट्स घेतल्या.

Sadu Shinde | Twitter
Harbhajan Singh | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी