गोमंतक ऑनलाईन टीम
अभिनेता शाहरूख खान आणि गौरी खान यांची कन्या सुहाना ही सोशल मीडियात चर्चेत असते. ती इंडस्ट्रीतील एक सेलिब्रिटी स्टार किड आहे.
सुहाना लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चिज' या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. या चित्रपटात ती व्हेरोनिका लॉज हे कॅरेक्टर साकारत आहे.
वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सुहानाने तिच्या चित्रपटातील वेरोनिका लॉज या कॅरेक्टरबाबत आणि खऱ्या आयुष्यातील सुहानाबदद्ल सांगितले.
सुहानाला विचारण्यात आले होते की, जर तिचा प्रियकर तिला फसवत असेल तर काय करशील? त्यावर सुहाना म्हणाली की, वेरोनिका म्हणून सांगायचे तर तिच्या मागे चाहत्यांची लाईन लागली आहे.
ती म्हणाली की, सुहाना म्हणून सांगायचे तर माझा प्रियकर मला फसवत असेल तर मीच त्याला सोडेन. मी वेरोनिकाच्या व्यक्तिरेखेपेक्षा वेगळी आहे. माझ्यासोबत असं झालं तर मला रडू येईल.
दरम्यान, सुहानाचे नाव सध्या अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत जोडले जात आहे. हे दोघेही एकाच चित्रपटातून डेब्यू करत आहेत.
सध्या सुहाना आणि अगस्त्य यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. तथापि, दोघांनीही याबाबत काहीही अधिकृतरित्या सांगितलेले नाही. द आर्चीज हा चित्रपट 12 डिसेंबरला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.