किंग खान म्हणाला, गप्प बस... ती दोन मुलांची आई आहे!

गोमंतक ऑनलाईन टीम

किंग ऑफ रोमान्स

अभिनेता शाहरूख खान त्याच्या अॅक्टिंग, परफॉर्मन्स आणि रोमँटिक भुमिकांसाठी जगभरात लोकप्रिय आहे.

Shah Rukh Khan | Instagram

सेन्स ऑफ ह्युमर आणि हजरजबाबी

याशिवाय शाहरूखचा सेन्स ऑफ ह्युमर, स्वतःवर जोक करण्याची स्टाईल आणि हजरजबाबीपणासाठीही अनेकजण त्याचे चाहते आहे.

Shah Rukh Khan | Instagram

Ask SRK सेशन

शाहरूख अधूनमधून ट्विटटवर आस्क एसआरके सेशन घेत असतो. यात तो स्वतः चाहत्यांच्या ट्विटवरून विचारलेल्या प्रश्नांचा उत्तरे देतो.

Shah Rukh Khan | Instagram

शाहरूखची भन्नाट उत्तरे

आस्क एसआरके सेशनमधील शाहरूखची उत्तरे भन्नाट असतात. बुद्धिमता, कॉमिक सेन्स त्याच्या या उत्तरांमधून नेहमी दिसतो.

Shah Rukh Khan | Instagram

मजेशीर रिप्लाय

अनेकजण खोचकपणे शाहरूखला काहीही प्रश्न विचारत असतात पण शाहरूख स्वतःच्या मजेशीर रिप्लायमधून तो अशांची तोंडे बंद करतो.

Shah Rukh Khan | Instagram

नयनतारा दोन मुलांची आई

नुकतेच Ask SRK सेशनमध्ये एका चाहत्याने किंगखानला विचारले की, नयनतारा प्रेमात पडली का? त्यावर शाहरूख म्हणाला की, गप्प बस...ती दोन मुलांची आई आहे!

Nayanthara | Instagram

वाचा शाहरूखचे इतर रिप्लाय

एका युजरने शाहरूखला म्हटले की, आता शाहरूख तरूण नाही. तरूण असण्याचेही वय असते. त्यावर शाहरूखने रिप्लाय दिलाय की, पण मूर्खपणाला वय नसते.

Nayanthara | Instagram
Janhvi Kapoor | Dainik Gomantak