Pranali Kodre
आयपीएल 2023 मध्ये 6 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना झाला.
हा सामना केकेआरच्या घरच्या मैदानात म्हणजेच ईडन्स गार्डन्सवर पार पडला.
केकेआरने तब्बल 81 धावांनी जिंकलेल्या या सामन्यासाठी शाहरुख खान देखील स्टेडियमवर उपस्थित होता.
बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख केकेआरचा सहसंघमालक आहे. त्यामुळे तो नेहमीच आपल्या केकेआर संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात येतो.
दरम्यान, सामना संपल्यानंतर शाहरुखने आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीचीही भेट घेतली.
या भेटीदरम्यानचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत असून बरीच चर्चा सुरू आहे.
या भेटीदरम्यान विराट शाहरुखबरोबर त्याने काम केलेल्या पठाण चित्रपटातील 'झूम जो पठाण' गाण्यावर डान्स करतानाही दिसला.
शाहरुखने विराटबरोबरच सामन्यानंतर दोन्ही संघातील क्रिकेटपटूंचीही भेट घेतली.
तो केकेआरच्या खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रुममध्ये विजयाच्या सेलिब्रेशनमध्येही सामील झाला होता.
शाहरुखबरोबर हा सामना पाहाण्यासाठी त्याची मुलगी सुहाना खानही आली होती.