Akshay Nirmale
अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा रजपूत कपूर (Mira Rajput Kapoor) खूप अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. बऱ्याचदा तर ती शाहिदपेक्षाही जास्त भाव खाऊन जाते.
मीरा स्टायलिश आहे. ती तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
मीरा ही सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सर आहे. तिचे अनेक फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल होत असतात.
मीराला इन्स्टाग्रामवर 46 लाखांवर फॉलोअर्स आहेत.
नुकतीच मीरा मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आली. तेव्हा तिने परिधान केलेल्या ड्रेसचीही चर्चा आता बी टाऊनमध्ये सुरू आहे.
मीराने या ड्रेसवर Gianvito Rossi या ब्रँडचे मल्टीकलर बीडेड ग्लॅडिएटर सँडल परिधान केले होते. त्याची किंमत एक लाख रूपयांहून अधिक आहे.
मीराने या ड्रेससोबत Cristian Dior या ब्रँडची एक सॅडल पर्स सोबत घेतली होती. त्या पर्सची किंमत 4,66,775 रूपये इतकी आहे.