Pramod Yadav
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या वर्षी खूप चर्चेत आला. मात्र, चर्चेचे कारण अमली पदार्थ हे होते.
कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी आर्यन खान आणि इतर 09 जणांना 03 ऑक्टोंबर 2021 रोजी अटक केली होती.
यानंतर न्यायालयात झालेल्या विविध सुनावणी दरम्यान, आर्यनला तब्बल 26 दिवस जेलमध्ये राहवे लागले. याकाळात त्याला जामीन देखील नाकारण्यात आला.
मुंबई NCB च्या पथकाने समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकून आर्यन खान याच्यासह इतरांना अटक केली होती.
समीर वानखेडे यांच्यावर ही कारवाई बनावट आणि सूडबुद्दीने केली असल्याचा आरोप करण्यात आला.
आर्यन खान प्रकरणात नंतर राजकारण देखील झाले, यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी आक्रमक भूमिका घेतली.
नवाब मलिक यांनी विविध पुरावे सादर करत ही कारावाई बनावट आणि पैशाच्या उद्देशाने केल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला.
आर्यन खानविरोधात अमली पदार्थाचे सेवन आणि विक्री केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मे 2022 मध्ये एनसीबीने पुरेशा पुराव्या अभावी आर्यन खानला क्लिन चीट दिली.
तसेच, याप्रकरणामुळे चर्चेत आलेले NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या पेरेंट कॅडरमध्ये परत पाठवण्यात आलं आहे.