Manish Jadhav
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे.
चेन्नईत आजपासून भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात झाली. दरम्यान, भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर फलंदाज शफाली वर्माने आपल्या शानदार खेळीच्या जोरावर इतिहास रचला आहे.
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारती महिला संघाची सलामीवीर शफाली वर्माने शानदार द्विशतक झळकावले.
शफाली वर्माच्या आगोदर केवळ एका भारतीय फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले होते, मात्र आता या यादीत शफालीचेही नावही जोडले गेले आहे.
मिताली राजने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले होते. मिताली राजने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध 214 धावांची इनिंग खेळली होती. याआधी आणि त्यानंतर कोणत्याही महिला फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती.
शफाली वर्माला मिताली राजचा विक्रम मोडता आला नाही. तिने 195 चेंडूत 205 धावा केल्या. या खेळीत तिने 23 चौकार आणि आठ षटकार लगावले. यावेळी तिचा स्ट्राइक रेट 104 पेक्षा जास्त होता.