गोमंतक ऑनलाईन टीम
वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश मानला जातो. त्यामुळे प्रवेशद्वार स्वच्छ, सुंदर आणि प्रकाशमान ठेवा.
घरातील ईशान्य दिशा शुभ मानली जाते. या ठिकाणी अनावश्यक वस्तूंचा साठा न करता जागा स्वच्छ आणि मोकळी ठेवा.
वास्तुशास्त्रानुसार घरातील ईशान्य कोपरा देवघरासाठी शुभ मानला जातो. देवघरात प्रसन्न आणि शांत वातावरण ठेवा.
आग्नेय दिशा अग्नीशी संबंधित असल्याने स्वयंपाकघरासाठी योग्य मानली जाते. स्वयंपाकघर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा.
बंद पडलेली घड्याळे, तुटलेली भांडी आणि निरुपयोगी वस्तू घरातून काढून टाका. यामुळे घरात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा राहतो.
खिडक्या आणि पडदे अशा पद्धतीने ठेवा की घरात पुरेसा सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येईल. यामुळे घराचे वातावरण प्रसन्न राहते.
तुळस, मनी प्लांट आणि इतर शोभेची रोपं घराला सुंदर बनवतात. वास्तुशास्त्रातही काही वनस्पतींना सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.