Sameer Panditrao
सेरेंडिपीटी कला महोत्सवात आझाद मैदानावर भरवण्यात आलेली ‘इन्फिनिटीट ड्रेप’, ‘स्टेप वेल्स: पोएट्री इन क्राफ्ट’ आणि ‘होम इज व्हेअर द हार्ट इज’ ही प्रदर्शने न चुकवता येण्याजोगी आहेत.
गुजरात आणि राजस्थानच्या शुष्क प्रदेशात जमिनीत खोलवर कोरल्या गेलेल्या विहिरी आढळतात. या विहिरी केवळ जलाशय नाहीत- त्या एकत्र येण्याच्या जागा आहेत
घर ही केवळ एक भौतिक जागा नाही तर ती आराम, सुरक्षितता आणि आपलेपणाची खोल भावना यांचे भंडार आहे.
घराबद्दलच्या आपल्या या जाणिवांना हस्तकलेच्या माध्यमातून विविध कलाकारांनी या प्रदर्शनात दृश्य रूप दिले आहे.
या दालनात रश्मी वर्मा यांनी साडी नेसण्याच्या 16 पद्धती सादर केल्या आहे.
यात केवळ साडी नेसण्याची विविधता नाही तर विविध प्रदेशातील साडी परिधान करणाऱ्या पिढ्यानपिढ्यांच्या सौंदर्यदृष्टीची खुण आहे.
हे दालन आपल्याला एका परंपरेचा अनुभव घ्यायला लावते.