Akshata Chhatre
पावसाळा आला की गोवा निसर्गाच्या कुशीत हरवून जातो. भातशेती, गर्द जंगलं आणि खळखळणारे धबधबे… सगळीकडे केवळ हिरवळ.
पाऊस इथे अडथळा ठरत नाही, उलट सौंदर्य वाढवतो. कुटुंबासोबत निसर्गात रमण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो.
पाऊस असेल तरी थांबू नका. अनुभवी मार्गदर्शकाशी सोबत घेत जंगलात ट्रेक करा. इथली हवा ताजी वाटते, आणि कदाचित पक्षी, फुलपाखरं तुमचं स्वागत करेल.
प्रत्येक धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेक करावाच लागतो असं नाही. हरवळे धबधबा येथे असलेल्या धबधब्याकडे रस्त्याने सहज पोहोचता येते. कुटुंबासाठी उत्तम आणि सुरक्षित आहे.
गोव्याची ऐतिहासिक ठिकाणं पावसात अधिकच सुंदर भासतात. शेवाळांनी मढलेली पायवाट, पावसाने धुतलेल्या भिंती आणि हिरवळीच्या कुशीत दडलेली जुनी वास्तु इथं इतिहास निसर्गासोबत एकरूप होतो.
सुपारीच्या बागेतल्या शांत कोपऱ्यात क्षणभर थांबा. जेव्हा पाऊस थांबतो आणि सूर्यकिरण झाडांमधून चमकतात, तेव्हा प्रत्येक पान झळाळून उठतं. अशी शांतता क्वचितच अनुभवायला मिळते.
छपरावर पडणारा पावसाचा टपोरा आवाज. गरम चहा किंवा कॉफी आणि गप्पा. गोव्याच्या पावसात असे कोपरे केवळ आसराच देत नाहीत, तर मनालाही विश्रांती देतात.