Pranali Kodre
फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे सध्या पॅरिस-सेंट-जर्मेन (PSG) संघाकडून खेळतो. पण त्याचा या संघाबरोबर 2024 मध्ये करार संपणार आहे.
दरम्यान, एमबाप्पे यानंतर पीएसजी संघातच कायम राहाणार की दुसऱ्या संघात सामील होणार ही चर्चा सातत्याने होत आहे.
याचदरम्यान मीडियातील रिपोर्ट्सनुसार एमबाप्पेला सौदी अरेबियाच्या अल-हिलाल क्लबने 2700 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचे समजत आहे.
एमबाप्पेला मिळालेली कथिथ ऑफर सौदीच्याच अल-नासर क्लबने ख्रिस्तियानो रोनाल्डोशी केलेल्या करारापेक्षा 900 कोटी अधिक आहे.
रोनाल्डोशी अल-नासरने 2022 मध्ये आडीच वर्षांसाठी 1800 कोटी रुपयांचा करार केला आहे.
दरम्यान, अल-हिलाल क्लबने लिओनल मेस्सीलाही संघाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. पण मेस्सीने ही ऑफर नाकारली, असे वृत्त मीडियात आले होते.
मेस्सीने पीएसजीची साथ सोडल्यानंतर इंटर मियामी क्लबशी करार केला आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की एमबाप्पेला कथित ऑफर देणाऱ्या अल हिलाल क्लबकडून आत्तापर्यंत करिम बेंजेमा, रॉबर्टो फिरमिनो असे स्टार खेळाडू खेळले आहेत.