गोमंतक ऑनलाईन टीम
क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरची कन्या सारा हीचे नाव भारताचा सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू शुबमन गिलसोबत जोडले गेले होते.
सारा आणि शुबमन दोघेही चांगले मित्र आहेत.
सध्या क्रिकेट वर्ल्डकप सुरू झाला आहे. पण, संघात असूनही डेंग्यू झाल्यामुळे शुबमनला एकही सामना खेळता आलेला नाही.
त्यामुळेच लाखो फॅन्ससोबत सारा तेंडूलकरही शुबमन बरा होण्याची वाट पाहत आहे. साराने गेट वेल सून शुबमन असे ट्विट केले आहे.
तथापि, हे साराचे अधिकृत अकाऊंट आहे की नाही, हे कळलेले नाही. साराची दोन ते तीन ट्विटर अकाऊंट आहेत.
तथापि, चाहत्यांनी साराच्या या ट्विटरवर भरभरून लाईक्सचा वर्षाव केला आहे.
सारा आणि शुबमन रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा झाली होती. नंतर शुबमनचे नाव सारा अली खानसोबतही जोडले गेले होते.