Akshata Chhatre
गोव्यातील राय येथील 'डी'मेलो हाऊस' हे घर राज्यातील सर्वात भुताटकीच्या ठिकाणांपैकी एक मानले जाते.
या घराशी संबंधित अनेक गूढ कथा प्रसिद्ध आहेत, पण त्यामागे दोन भावांच्या वादग्रस्त कथेचा संदर्भ जोडलेला आहे.
एकदा एकाच घरातील दोन भावांमध्ये मालमत्तेवरून मोठा वाद सुरू होता. दोघांनाही संपूर्ण मालमत्ता हवी होती आणि त्यावरून त्यांच्यात सतत भांडणे होत असत.
असं म्हणतात की, एक दिवस हा वाद इतका वाढला की, एका भावाने दुसऱ्याची हत्या करून त्याचा मृतदेह घराच्या अंगणात पुरला.
या घटनेनंतर, हे घर भुताटकीचे म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेक लोकांना रात्रीच्या वेळी घरातून ओरडण्याचे आणि काचा फुटण्याचे आवाज ऐकू आल्याचा अनुभव येतो असं स्थानिक लोकं सांगतात.
स्थानिक लोकांचा विश्वास आहे की, मयत भावाचा आत्मा अजूनही या घरातच आहे
आजही हे घर एक रहस्यमय आणि भयावह ठिकाण म्हणून ओळखले जाते.