Pranali Kodre
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने 27 जानेवारी 2023 रोजी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत ग्रँडस्लॅम कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला.
सानियाने भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्नाच्या साथीत ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेतील मिश्र दुहेरीचा अंतिम सामना खेळला.
या अंतिम सामन्यात सानिया आणि बोपन्ना जोडीला ब्राझीलच्या ल्युसा स्टेफानी आणि राफेल मातोस या जोडीने 6-7 (2-6), 2-6 अशा फरकाने पराभूत केले.
या सामन्यासह सानियाने ग्रँडस्लॅम कारकिर्दीला अलविदा केले.
सानियाने 2005 साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपासूनच ग्रँडस्लॅम कारकिर्दीला सुरुवात केली होती.
सानियाने तिच्या 18 वर्षांच्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीत एकूण 6 विजेतीपदे मिळवली.
तिने 2009 मध्ये मिश्र दुहेरीत महेश भूपतीसह ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2012 साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली.
त्यानंतर तिने 2014 साली ब्राझीलच्या ब्रुनो सोरेसबरोबर मिश्र दुहेरीत अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.
सानियाने महिला दुहेरीत 2015 साली विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.
तसेच महिला दुहेरीत 2016 साली सानियाने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले होते.
सानियाने महिला दुहेरीतील तिची तिन्ही विजेतीपदे स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसबरोबर खेळताना जिंकली होती.
सानिया काहीकाळ दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावरही होती.
सानियाला आत्तापर्यंत अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, पद्म पुरस्कार अशा मानाच्या पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.