Wai Battle History: "स्वराज्य राखले, मुघल गाडले!" वाईच्या संग्रामाने बदलला दख्खनचा इतिहास; शंभूराजांच्या लढाईचा थरारक इतिहास

Manish Jadhav

मुघलांचे गोवा-कोकण अभियान अपयशी

रामसेजचा किल्ला लढवल्यानंतर आणि गोव्यातील पोर्तुगीजांचा धुव्वा उडवल्यानंतर, मुघल सम्राट औरंगजेबाने आपला मुख्य सरदार शहाबुद्दीन खान आणि खानजहान याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे आर्थिक व लष्करी केंद्र मोडून काढण्यासाठी वाईच्या दिशेने मोठी फौज पाठवली.

chhatrapati sambhaji maharaj | Dainik Gomantak

सेनापती हंबीरराव मोहिते यांची रणनीती

औरंगजेबाच्या अफाट सेनेला रोखण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपले पराक्रमी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना वाईच्या रणांगणात तैनात केले. मराठ्यांनी वाई आणि महाबळेश्वरच्या डोंगराळ भागाचा अचूक वापर करत मुघल फौजेची कोंडी केली.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Dainik Gomantak

गनिमी काव्याने मुघल सैन्याची दाणादाण

वाईच्या रणांगणात मराठ्यांनी पारंपरिक 'गनिमी कावा' आणि अचानक हल्ले करण्याची पद्धत वापरली. मुघलांची रसद तोडल्यामुळे आणि सह्याद्रीच्या दुर्गम वाटांमध्ये त्यांना घेरल्यामुळे मुघल सेनेत प्रचंड घबराट पसरली.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Dainik Gomantak

तोफांचा भीषण भडिमार

वाईजवळ दोन्ही सैन्यात समोरासमोर आणि अत्यंत भीषण लढाई झाली. मराठ्यांच्या घोडदळाने मुघल छावणीत थेट घुसून धुमाकूळ घातला, ज्यामुळे मुघल सरदारांना माघार घेणे भाग पडले.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Dainik Gomantak

सरसेनापती हंबीररावांचे अतुलनीय शौर्य

या लढाईत हंबीरराव मोहिते यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मुघल सैन्यावर थेट हल्ला चढवला. त्यांच्या या तुफानी आक्रमणामुळे मुघलांचे हजारो सैनिक मारले गेले आणि मुघल सेना रणनीतिकदृष्ट्या पूर्णपणे पराभूत झाली.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Dainik Gomantak

मराठ्यांचा ऐतिहासिक विजय

या घनघोर युद्धात छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा दारुण पराभव केला. या विजयामुळे औरंगजेबाचा दक्षिण दिग्विजय करण्याचा आणि स्वराज्य जिंकण्याचा प्लॅन पुन्हा एकदा पारधुळीस मिळाला.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Dainik Gomantak

स्वराज्याच्या लष्करी सामर्थ्याचा सुवर्णक्षण

वाईच्या लढाईतील विजयाने हे सिद्ध केले की, छत्रपती शिवाजी महाराजांनंतरही छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य सैनिकीदृष्ट्या तितकेच आक्रमक, सक्षम आणि अभेद्य आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Dainik Gomantak

Stop Eating Onions: घरचे म्हणतील, "हा चमत्कार झाला कसा?" 1 महिना कांदा सोडून तर पाहा!

आणखी बघा