दैनिक गोमन्तक
बॉलिवुडचा दबंग खान 57व्या वर्षी पण अविवाहित आहे. पण त्याचे लव्ह अफेअर खूप गाजले आहेत. एकेकाळी तो विश्वसुंदरीच्या प्रेमात अखंड बुडाला होता.
हम दिल दे चुके सनम या सिनेमात ही जोडी सुपरहिट ठरली. ते खऱ्या आयुष्यात पण एकमेकांच्या प्रेमात होते.
पण त्यांच्यामध्ये वाद होऊन ब्रेकअप झालं, त्याने खूप प्रयत्न केले पण पुढे ते एकत्र आले नाहीत.
दबंगच्या आयुष्यात पुढच्या काळात कॅटरिनाची एन्ट्री झाली, ते रिलेशनमध्ये होते अशी कायम चर्चा असायची.
पण कॅटरिना रणबीरच्या प्रेमात पडली आणि यादोघांचे मार्ग वेगळे झाले होते.
रोमानियाची मॉडल, अक्ट्रेस युलिया वंतूरसोबत सलमान खान रिलेशनमध्ये होता, ती कायम खान कुटुंबाच्या सगळ्या कार्यक्रमांत दिसायची.
संगिता बिजलानी सलमानची फर्स्ट गर्लफ्रेंड आहे. तो तिला कायमच खास वागणुक देताना दिसतो.
जॅकलिनसोबत पण सलमानचे नाव जोडले जाते. तसेच कोरोना काळात ते दोघे सलमानच्या फार्म हाऊसवर खूप दिवस एकत्र राहिल्याने त्याची चर्चा खूप झाली.
बॉलिवुडमध्ये सोनाक्षी सिन्हाला सलमानने लॉन्च केले, दबंग ही तिची पहिलीच आणि सुपरहिट फिल्म होती.
हे दोघे छान बॉंड शेअर करतात. पण आता तर सोनाक्षी आणि सलमानने गुपचुप लग्न केल्याची चर्चा होती.