Kavya Powar
54 व्या इफ्फीसाठी अनेक अभिनेते-अभिनेत्री रेड कार्पेटवर हजेरी लावत आहेत.
आज इफ्फीच्या दुसऱ्या दिवशी सर्वांच्या लाडक्या सल्लूभाईने म्हणजेच सलमान खानने ग्रँड एंट्री केली.
या महोत्सवात सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्रीचा पहिला चित्रपट 'फर्रे' प्रदर्शित केला जाणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, अभिषेक यादव आणि पाधी यांनी चित्रपटाचे लिखाण केले आहे.
सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी रेड कार्पेटवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
रेड कार्पेटवर जात असताना एका महिला फॅनने सलमानकडे ऑटोग्राफ देण्याची विनंती केली, त्यावेळी पुढे गेलेला सलमान मागे येऊन त्याने आपल्या फॅनची इच्छा पूर्ण केली.
फर्रे चित्रपटाची पूर्ण टीम यावेळी उपस्थित होती