SAFF Championship: भारत विक्रमी 9 व्यांदा चॅम्पियन, पाहा आजपर्यंतचे विजेते

Pranali Kodre

विजेतेपद

दक्षिण आशियाई महासंघ अजिंक्यपद 2023 स्पर्धा (SAFF Championship) सुनील छेत्रीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जिंकली.

Indian Football Team | Twitter

अंतिम सामना

बंगळुरुमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने संघाने कुवेतला निर्धारित वेळेत 1-1 ची बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शुटआऊटमध्ये 5-4 अशा गोलफरकाने पराभूत केले.

Indian Football Team | Twitter

नववे विजेतेपद

हे भारतीय संघाचे नववे साफ चॅम्पियनशीपचे विजेतेपद ठरले.

Indian Football Team | Twitter

विक्रम

यंदा 14 व्यांदा साफ चॅम्पियनशीप स्पर्धा खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत सर्वाधिक 9 वेळा भारतीय संघाने विजेतेपद जिंकले आहे.

SAFF Championship Trophy | Twitter

भारतीय संघ

भारताने 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015, 2021 आणि 2023 या नऊ वर्षी या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

Indian Football Team | Twitter

मालदीव

त्यानंतरल मालदीवने 2 वेळा या स्पर्धेचे विजेतेपद नावावर केले. मालदीवने 2008 आणि 2018 या दोन वर्षी विजेतेपद नावावर केले.

Maldives | Twitter

प्रत्येकी 1 विजेतेपद

याशिवाय बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघांनी प्रत्येकी 1 वेळा विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

Afghanistan | Twitter

बांगलादेश, अफगणिस्तान, श्रीलंकेची विजेतीपदं

बांगलादेशने 2003 साली, अफगाणिस्तानने 2013 साली आणि श्रीलंकाने 1995 साली विजेतेपदाला गवसणी घातली होती.

Bangladesh | Twitter
MS Dhoni Wife Sakshi | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी