Akshata Chhatre
गणेशोत्सवात गणरायाच्या विसर्जनावेळी भक्तांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 'द्रिष्टी लाइफसेव्हर्स’ राज्यभर तैनात करण्यात आले आहेत.
यामध्ये समुद्र किनाऱ्यांसह इतर ठिकाणी लाइफगार्ड्स आणि स्वयंसेवक कार्यरत राहणार असून, उशिरापर्यंत ही सेवा सुरू असते.
मान्सूनमुळे सागरात प्रवेश अद्याप पूर्णपणे खुला नसल्याने, विसर्जनानंतर भक्तांना सुरक्षित बाहेर काढण्याची जबाबदारीही या जवानांकडे असते.
समुद्राच्या लाटांचा जोर वाढल्यास, लाइफगार्ड्सच मूर्ती खोल पाण्यात नेऊन विसर्जित करतात.
विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गटातील प्रौढांनी लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, अशी सूचना देण्यात येते.
आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी अतिरिक्त बॅक-अप व वाहनांची सोय करण्यात येते.
भक्तिभावाने साजरा होणाऱ्या या उत्सवात ‘सुरक्षितता प्रथम’ हा मंत्र अंगीकारतद्रिष्टी मरीनचे जवान दिवसरात्र सेवेत तत्पर असतात.