आई अन् बॅटसमोर नतमस्तक होत सचिनचा दसरा साजरा

Pranali Kodre

दसरा

भारतभरात 24 ऑक्टोबर रोजी दसरा आणि विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Dussehra

विजयादशमी

यादिवशी मोठ्यांचे आशिर्वाद घेतले जाते, तसेच सरस्वती पूजन केले जाते.

Dussehra

सचिनने साजरा केला दसरा

भारताचा महान क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरने दसरा उत्साहात साजरा केला आहे.

Sachin Tendulkar | Instagram

फोटो केले शेअर

सचिन तेंडुलकरने सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याने दसरा कसा साजरा केला, याचे काही फोटोही शेअर केले आहेत.

Sachin Tendulkar | Instagram

आईचे आशिर्वाद

सचिनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो त्याच्या आईचे आशिर्वाद घेताना दिसत आहे.

Sachin Tendulkar | Instagram

बॅटसमोर नतमस्तक

तसेच सचिन त्याचे मैदानातील शस्त्र म्हणजेच बॅटसमोरही नतमस्तक झाल्याचे दिसत आहे.

Sachin Tendulkar | Instagram

सचिनकडून शुभेच्छा

सचिनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की 'विजयादशी साजरा करणाऱ्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. ज्याप्रमाणे चेंडू सीमारेषेबाहेर जातो, त्याचप्रमाणे वाईटावर चांगल्याचा विजय होवो आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होवो. योग्य कारणासाठी फलंदाजी करत रहा.'

Sachin Tendulkar | Instagram

प्रतिक्रिया

सचिनच्या या पोस्टवर त्याला अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

Sachin Tendulkar | Instagram

वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 क्रिकेटर

Virat Kohli | Twitter
आणखी बघण्यासाठी