Pranali Kodre
आयपीएल 2023 स्पर्धेत 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेला सामना दोन खेळाडूंच्या पदार्पणामुळे खास ठरला.
या सामन्यातून मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकर आणि ड्युआन यान्सिन या दोन युवा खेळाडूंचे आयपीएल पदार्पण झाले.
अर्जुन हा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असून सचिन देखील 2008 ते 2013 दरम्यान मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळला आहे.
त्यामुळे सचिन आणि अर्जुन आयपीएल खेळणारी पहिली पिता-पुत्रांची जोडी ठरली आहे.
तसेच ड्युआन यान्सिन हा मार्को यान्सिन याचा जुळा भाऊ आहे.
विशेष म्हणजे मार्कोने 2021 साली मुंबई इंडियन्सकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
त्यानंतर मार्कोला 2022 आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादने 4 कोटी 20 लाखाला खरेदी केले असून तो गेले दोन वर्षे या संघाकडून खेळत आहे.
त्याचमुळे ड्युआन आणि मार्को ही आयपीएल खेळणारी पहिली जुळ्या भावांची जोडी ठरली आहे.