Pranali Kodre
चीनमध्ये सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश करण्यात आला असून भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे.
या स्पर्धेत भारताचे मानांकन उच्च असल्याने त्यांचा थेट उपांत्यपूर्व फेरीत समावेश करण्यात आला आहे.
भारताने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळविरुद्ध 23 धावांनी विजय मिळवला.
या विजयासह भारताने पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा या स्पर्धेतील पहिला विजय देखील ठरला आहे.
भारताच्या या विजयामुळे ऋतुराज गायवाडची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून देखील विजयी सुरुवात झाली आहे.
ऋतुराज हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये नेतृत्व करणारा १२ वा कर्णधार आहे. (आकडेवारी 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत).
यापूर्वी भारताचे टी20 क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंनी किमान एका तरी सामन्यात नेतृत्व केले आहे.
ऋतुराजपूर्वी विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांनी टी२० क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.