Ashutosh Masgaunde
वॅगनर ग्रुप, ज्याला अधिकृतपणे PMC वॅगनर म्हणतात, ही एक रशियन निमलष्करी संघटना आहे. ही मुळात खाजगी लष्करी कंपनी आणि भाडोत्री सैनिकांचे नेटवर्क आहे.
वॅगनर ग्रुपची ओळख प्रथम 2014 मध्ये जगासमोर आली. तेव्हा हा ग्रुप पूर्व युक्रेनमध्ये रशियन समर्थक फुटीरतावादी शक्तींना पाठिंबा देत होता.
वॅगनर ग्रुपचे 50 हजार सैनिका युक्रेनमध्ये 50,000 लढाऊ सैनिक सध्या रशियाच्या बाजूने युक्रेन विरुद्ध लढत आहेत.
दिमित्री उत्किन यांना चेचन्यातील रशियाच्या युद्धांचा एक अनुभवी म्हणून ओळखले जाते. त्यांनी वॅगनरचे पहिला फील्ड कमांडर म्हणून काम पाहिले असल्याचा दावा अनेक प्रसार माध्यमांनी केला आहे.
सध्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन आहेत, त्यांना "पुतिनचे शेफ" या टोपणनावाने ओळखले जाते. मात्र, आता त्यांनीत पुतिन यांना आव्हान दिले आहे.
2015 पासून, वॅगनर ग्रुपचे भाडोत्री सैनिक सीरियामध्ये आहेत, ते सरकार समर्थक सैन्यासोबत लढत आहेत आणि तेलक्षेत्रांचे रक्षण करत आहेत.
पश्चिम आफ्रिकेतील माली सरकार वॅगनर गटाचा वापर इस्लामिक अतिरेकी गटांविरुद्ध करत आहे.