Pramod Yadav
गोव्यातील बांदोडा, फोंडा येथे जैन बस्ती मंदीराची संरक्षित वास्तू आहे.
गोवा पुरातत्व खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार...
कंदब काळात 11 व्या शतकात या वास्तूचे बांधकाम केले असून, विजयनगर काळात 15 शतकात त्याची पुर्नबांधणी करण्यात आली.
श्रीपाला हे गुजरातचे राजे होण्याच्या मार्गावर होते.
त्यावेळी श्रीपाला यांनी बांदोडा येथे नेमिनाथ जैन बस्ती स्थापन केली. अशी माहिती आढळते.
गोवा सरकारच्या वतीने हे स्थळ संरक्षित म्हणून घोषित केले आहे. गोव्यातील जैन वास्तव्याचा हा एक पुरावा मानला जातो.
जांभ्या दगडात असलेल्या बांधकामाचे काही भाग कोसळले असून, मूळ वास्तू आजही दिमाखात उभी आहे.
येथे काही कन्नड भाषेतील शिलालेख देखील आढळतात.
बांधकामाचे पडलेले दगड, नक्षीकाम आणि इतर भाग वास्तूच्या बाहेर जपून ठेवण्यात आले आहेत.
गोवा सरकारच्या पुरातत्व खात्याच्या वतीने राज्यातील ऐतिहासिक महत्व असलेली 51 संरक्षित ठिकाणे आहेत.