Akshata Chhatre
डोळ्यांमध्ये खाज येणे किंवा थकवा जाणवल्यास नकळत आपण डोळे चोळतो
पण ही तात्पुरती आराम देणारी सवय आपल्या दृष्टीसाठी मोठा धोका निर्माण करू शकते.
डॉक्टरांच्या मते, वारंवार डोळे चोळल्याने केवळ बॅक्टेरिया आणि विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका वाढत नाही
डोळ्यांची नाजूक रचना, विशेषतः कॉर्नियाला गंभीर नुकसान पोहोचू शकते.
या सवयीमुळे 'केरेटोकोनस' सारखा आजार होऊ शकतो, ज्यामुळे दृष्टी अंधुक होते.
याशिवाय, डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूज येण्याची समस्या देखील वाढते.
त्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी ही सवय त्वरित सोडा आणि डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याची काळजी घ्या.