Pranali Kodre
भारतीय संघाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत खेळायचे आहेत.
तत्पुर्वी मिळालेल्या सुट्ट्यांदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवत आहे.
दरम्यान, अनेक रिपोर्ट्सनुसार आशिया चषकापूर्वी रोहितने तिरुपती येथील प्रसिद्ध बालाजी मंदिरात दर्शन घेतले.
तिरुपती बालाजीच्या दर्शनावेळी रोहितबरोबर त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा देखील होती.
त्याने तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.
रोहित आता आशिया चषकात २ सप्टेंबर रोजी खेळताना दिसणार आहे. या दिवशी भारताचा स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे.
दरम्यान, रोहितकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना आहे.