Pranali Kodre
'हिटमॅन' रोहित शर्मा हा आताच्या घडीला सर्वोत्तम सलमीवीरांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
रोहितने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली होती.
पण, रोहितने 2013 पासून वनडेमध्ये नियमित सलामीवीर म्हणून खेळण्यास सुरूवात केली होती.
त्याने 2011 मध्ये 3 सामन्यांत सलामीला फलंदाजी केलेली.
मात्र, नियमित सलामीवीर म्हणून त्याला 23 जानेवारी 2013 रोजी इंग्लंडविरुद्ध मोहालीत संधी मिळाली. त्याने त्या सामन्यात 83 धावांची खेळी केलेली.
त्यानंतर मात्र, त्याने मागे वळून पाहिले नाही.
रोहितने नियमित सलामीवीर म्हणून खेळताना पहिल्या 5 डावातच 3 अर्धशतके झळकावली होती.
त्याने सलामीला वनडेत 156 सामने खेळले असून 56.26 च्या सरासरीने 7764 धावा केल्या आहेत.
त्याची 264 धावा ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी असून हा वनडे क्रिकेटमधीलही एक विश्वविक्रम आहे.
रोहितने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 30 शतके झळकावली आहेत, यातील तब्बल 28 शतके त्याने सलामीला खेळताना केली.
रोहितने सलामीला खेळतानाच वनडेत तीन द्विशतके करण्याचा कारनामाही केला.
तसेच वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत तो सनथ जयसूर्यासह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत 45 शतकांसह सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे.