Pranali Kodre
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्मा आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो.
रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.
पण अनेकांना हे माहित नाही की रोहितने 2009 साली ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली खेळताना डेक्कन चार्जर्सकडून खेळाडू म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
त्यामुळे रोहितच्या नावावर कर्णधार म्हणून 5 आणि केवळ खेळाडू म्हणून 1 अशा एकूण 6 आयपीएल विजेतीपदे आहेत.
महत्त्वाचे म्हणजे रोहित 6 आयपीएल ट्रॉफी जिंकणारा एकमेव खेळाडू आहे.
रोहित 2008 ते 2010 दरम्यान डेक्कन चार्जर्सकडून खेळला, तर 2011 पासून तो मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.
रोहितने मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी 2013 साली स्विकारली.
त्याने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 असे पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहेत.