Pranali Kodre
भारताचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत.
रोहितने वनडेत तीन द्विशतकेही करण्याचा विश्वविक्रम केला आहे.
रोहितने त्याचे पहिले द्विशतक 2 नोव्हेंबर 2013 रोजी म्हणजेच बरोबर 10 वर्षांपूर्वी केले होते.
त्यावेळी तो वनडेत द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांच्यानंतरचा तिसराच खेळाडू ठरला होता.
रोहितने त्याचे पहिले वनडे द्विशतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूमध्ये खेळताना ठोकले होते.
त्यावेळी रोहितने 158 चेंडूत 12 चौकार आणि 16 षटकार ठोकत 209 धावांची खेळी केली होती.
या द्विशतकानंतर रोहितने 2014 मध्ये आणि 2017 मध्ये देखील प्रत्येकी एक वनडे द्विशतक ठोकले.