Rohit Sharma: अन् 16 वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटला मिळाला 'हिटमॅन'

Pranali Kodre

पदार्पण

भारतीय क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

Rohit Sharma | Twitter

पहिला सामना

रोहितने भारताकडून पहिल्यांदा आयर्लंडविरुद्ध बेलफेस्टमध्ये वनडे सामना खेळला होता. रोहितच्या या पदार्पणाला आता 16 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Rohit Sharma | Twitter

टी20 पदार्पण

रोहितने वनडेनंतर 2007 मध्येच सप्टेंबर महिन्यात टी20 वर्ल्डकपमधून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Rohit Sharma | Twitter

कसोटी पदार्पण

त्यानंतर कसोटी पदार्पणासाठी त्याला नोव्हेंबर 2013 ची वाट पाहावी लागली. त्याने पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध ईडन गार्डन्सला खेळला.

Rohit Sharma | Twitter

16 वर्षे

रोहितने या 16 वर्षात मोठे यश मिळवले असून तो आता भारतीय संघाचा कर्णधारही आहे.

Rohit Sharma | Twitter

वनडे कारकिर्द

रोहितने त्याच्या कारकिर्दीत 243 वनडे सामने खेळताना 30 शतके आणि 48 अर्धशकांसह 9825 धावा केल्या. यात त्याच्या तीन द्विशतकांचाही समावेश आहे.

Rohit Sharma | Twitter

कसोटी कारकिर्द

रोहितने 50 कसोटी सामने खेळले असून 9 शतके आणि 14 अर्धशतकांसह 3437 धावा केल्या आहेत.

Rohit Sharma | Twitter

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याने 148 सामने खेळले असून 4 शतके आणि 29 अर्धशतकांसह 3853 धावा केल्या आहेत.

Rohit Sharma | Twitter
Team India | Twitter
आणखी बघण्यासाठी