ODI वर्ल्डकपध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारे 5 क्रिकेटर

Pranali Kodre

भारताचा विजय

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय संघाने 11 ऑक्टोबर सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला.

Team India

सामनावीर रोहित

भारताच्या या विजयात रोहित शर्माने शतक करत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने 84 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांसह 131 धावांची खेळी केली. त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही मिळाला.

Rohit Sharma | Twitter/BCCI

1000 धावा

या खेळीदरम्यान रोहितने वनडे वर्ल्डकपमध्ये 1000 धावाही पूर्ण केल्या. तो वनडे वर्ल्डकपमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा जगातील 23 वा खेळाडू ठरला आहे.

Rohit Sharma | Twitter/BCCI

वॉर्नरशी बरोबरी

23 वा खेळाडू असला तरी त्याने वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा क्रिकेटपटू बनण्याच्या डेव्हिड वॉर्नरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.

Rohit Sharma | Twitter/BCCI

रोहितचा विश्वविक्रम

रोहितने 19 व्या डावात या 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.

Rohit Sharma | Twitter/BCCI

डेव्हिड वॉर्नर

वॉर्नरनेही 19 डावातच वनडे वर्ल्डकपमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.

David Warner

दुसरा क्रमांक

वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत रोहित आणि वॉर्नर यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या सचिन तेंडुलकर आणि एबी डिविलियर्स आहेत.

Sachin Tendulkar | Twitter/BCCI

सचिन आणि डिविलियर्स

सचिन आणि डिविलियर्सने वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी 20 डावात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.

AB de Villiers | Twitter/ICC

तिसरा क्रमांक

तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या विव रिचर्ड्स आणि सौरव गांगुली आहेत. रिचर्ड्स आणि गांगुली यांनी वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी 21 डावात 1000 धावा केल्या आहेत.

Sourav Ganguly | Twitter/ICC

Hardik Pandya: 2 मिनिटांच्या मॅगीवर दिवस ते 2 मिनिटांत मॅच फिरवणारा क्रिकेटर

Hardik Pandya | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी