Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 11 ऑक्टोबर रोजी भारतीय क्रिकेट संघाने दिल्लीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात रोहित शर्माने 84 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांसह 131 धावांची खेळी केली.
रोहितने ही खेळी करताना त्याचे शतक 63 चेंडूत पूर्ण केले होते.
त्यामुळे रोहित वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
रोहितने कपिल देव यांचा 40 वर्षे जूना विक्रम मोडला आहे.
कपिल देव यांनी 1983 साली झिम्बाब्वे विरुद्ध 72 चेंडूत शतक ठोकले होते. त्यामुळे तेव्हापासून गेली 40 वर्षे वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज म्हणून कपिल देव यांच्या नावावर विक्रम होता.
याबरोबर रोहित वनडे वर्ल्डकपमध्ये 7 शतके ठोकणारा जगातील पहिला क्रिकेटपटूही ठरला आहे.