षटकारांचा बादशाह 'हिटमॅन'

Manish Jadhav

हिटमॅनचा जलवा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित वेगळ्याच मूडमध्ये दिसला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 6 षटकार मारले. रोहितने षटकार ठोकून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले.

Rohit Sharma | Dainik Gomantak

रेकॉर्डचा बादशाह 'रोहित'

रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 550 षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलचा विक्रम मोडला. रोहितने 471 डावात 550 षटकारांचा टप्पा ओलांडला. मात्र, सध्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा विक्रम गेलच्या (553) नावावर आहे.

Rohit Sharma | Dainik Gomantak

एका देशात सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम

एका देशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा पराक्रम रोहितने केला आहे. त्याने या बाबतीत न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलचा मागे टाकले आहे. रोहितने भारतात 257 षटकार तर न्यूझीलंडमध्ये गप्टिलने 256 षटकार मारले आहेत.

Rohit Sharma | Dainik Gomantak

पहिला भारतीय

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 550 षटकार ठोकणारा रोहित पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

Rohit Sharma | Dainik Gomantak

एका डावात सर्वाधिक वेळा 5 षटकार

एका डावात सर्वाधिक वेळा 5 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा रोहित हा भारतीय फलंदाज आहे, त्याने असे 31 वेळा केले आहे.

Rohit Sharma | Dainik Gomantak

वनडेत पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक षटकार

2002 पासून, वनडेमध्ये पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित अव्वल आहे. त्याने आतापर्यंत 89 षटकार मारले आहेत.

Rohit Sharma | Dainik Gomantak

रोहितनंतर...

वनडेत पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहितनंतर या यादीत वरेंद्र सेहवाग (43), शिखर धवन (24), सचिन तेंडुलकर (12), शुभमन गिल (12), विराट कोहली (11) आणि सौरव गांगुली (11) आहे.

Rohit Sharma | Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

  1. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – 553 षटकार

  2. रोहित शर्मा (भारत) – 551 षटकार

  3. शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) - 476 षटकार

Rohit Sharma | Dainik Gomantak

Asian Games पूर्वी टीम इंडिया अन् नीरज चोप्राची स्पेशल भेट

Team India | Rinku Singh | Instagram
आणखी बघण्यासाठी