Pranali Kodre
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरला 9 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे.
रोहितचे हे कसोटी कर्णधार म्हणून पहिलेच शतक होते.
त्यामुळे रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात शतक करणारा पहिलाच भारतीय, तर जगातील तिसरा कर्णधार ठरला आहे.
रोहितने वनडेमध्ये भारताचे नेतृत्व करताना 3 शतके केली आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करताना 2 शतके केली आहेत.
रोहितव्यतिरिक्त तिलकरत्ने दिल्शान, फाफ डू प्लेसिस आणि बाबर आझम यांनी राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात किमान एक शतक करण्याचा कारनामा केला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेलिसने कर्णधार म्हणून कसोटीत 5 शतके, वनडेत 5 शतके आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 शतक केले आहेत.
श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिल्शानने नेतृत्व करताना कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी 1 शतक केले आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कर्णधार म्हणून कसोटीत 4 शतके, वनडेत 6 शतके आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 शतक केले आहेत.